चिंचेचा भात
MHNEWS |
कृती : प्रथम भात मोकळा शिजवून एका पसरट परातीत ठेवावा. मीठ घालावे. एका कढईत तेल गरम करावे. क्रमाक्रमाने एक एक साहित्य घालावे. हिंग, मोहरी, जिरे, लाल मिरच्या, कढीपत्ता व हळद घालावी. तयार फोडणीत उडदाची डाळ घालावी व ती परतून घ्यावी. त्यामध्ये तयार गूळ घातलेला चिंचकोळ घालावा व भिजत घातलेली डाळ (हरबरा, मसूर) घालावी. १/४ भांडे / चारच चमचे पाणी घालून उकळावे व तयार झालेली फोडणी भातावर घालीवी. चवीनुसार मीठ घाला. वरून कोथिंबीर सजवून भात वाढावा. वरून भिजलेले दाणे घालावे.
साभार : महान्यूज
