1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: सांगली , मंगळवार, 12 ऑगस्ट 2014 (12:14 IST)

पराभूत झालो तर राजकारण सोडेन

r r patil
तासगावमधून प्रचंड मतांनी विजयी झालो तर खासदारकी सोडावी लागेल आणि जर मी पराभूत झालो तर राजकारण सोडेन, या शब्दात राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सोमवारी भाजपचे सांगलीतील खासदार संजयकाका पाटील यांना आव्हान दिले. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळाव्यासाठी आर. आर. पाटील सांगलीमध्ये आले होते. मेळावत बोलताना त्यांनी संजयकाका पाटील यांचे नाव न घेता त्याच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, तासगाव विधानसभेसाठी मला आव्हान देणार्‍यांनी पुढे यावे. मीही मैदानात असणारच आहे. प्रचंड मतांनी विजयी झालो, तर खासदारकी सोडावी लागेल आणि जर मी पराभूत झालो, तर राजकारण सोडेन. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. त्यांनीही या मेळाव्यात शिवसेना-भाजपवर टीका केली.