राज ठाकरेंचे पुन्हा 'युटर्न'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी आज (सोमवार) पुन्हा युटर्न घेतला. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भीमगर्जना करणारे राज ठाकरे यांनी काल (रविवारी) नागपूर येथे निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते. परंतु राज ठाकरे यांनी पुन्हा आज सकाळी आपली भूमिका बदलली. आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचे आपण संकेत दिलेच नसल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचेही ठाकरे यांनी सांगितले आहे. येत्या चार-पाच दिवसांत आपण या प्रकरणी निर्णय घेणार असल्याचेही राज यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरे रविवारी विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखतींसाठी नागपूर दौर्यावर होते.इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे कुटूंबात कुणीही निवडणूक लढलेली नसल्याचे त्यांनी सांगितल होते. संपूर् महाराष्ट्र आपला मतदार संघ आहे. त्यामुळे या मतदार संघातून निवडणूक लढली तर दुसर्या मतदार संघांने काय पाप केले? असा भावनिक प्रश्न स्वत: उपस्थित करून राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याच्या संकेत दिले होते.
