1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता

बोल

- अनंत बावने

ND
बोल बोलता बोलता
बोल अबोल जाहले ।।
मुक्या वेदनांचे शब्द
उर फुटून निघाले....

निघे शब्दविणा गाणे
ताल सुरांच्या संगमी ।।
आर्त नाद निघे कसा,
नाही आले ध्यानी मनी....

आता झाले शब्द माझे
बोल घेवड्याच्या शेंगा ।।
शेंगाशेंगात ठासला,
शब्द माझा नवा नवा ...

आली वेळ तशी गेली
गेली मुंगीच्या पावली ।।
सारे बोल पाहू जाता,
केले मुक्याच्या हवाली ....
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा