1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
  4. Five major grand Shri Ram temples in the country

Shri Ram Navami Temple Darshan देशातील पाच प्रमुख भव्य श्रीराम मंदिरे

shri ram temple
India Tourism : प्रभू श्रीरामाचे जीवन आणि आदर्श संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहेत. भारतात अशी अनेक भव्य मंदिरे आहेत जी केवळ धार्मिक श्रद्धेची केंद्रे नाहीत, तर वास्तुकलेचे  उत्कृष्ट नमुने देखील आहे . आज आपण देशातील पाच प्रमुख आणि भव्य श्रीराम मंदिरे पाहणार आहोत जिथे तुम्ही दर्शनाला नक्कीच जाऊन शकतात. 
 
श्री राम जन्मभूमी मंदिर, अयोध्या (उत्तर प्रदेश)
श्री राम जन्मभूमी मंदिर हे जगातील सर्वात मोठे आणि भव्य हिंदू मंदिरांपैकी एक आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर  जानेवारी २०२४ रोजी याचे उद्घाटन झाले. हे मंदिर संपूर्णपणे दगडात (नागर शैली) बांधले असून यात लोखंडाचा वापर केलेला नाही. येथील 'राम लल्ला' यांची मूर्ती शाळीग्राम शिळेतून साकारलेली आहे. ७० एकर परिसरात पसरलेले हे संकुल, कोरीव खांब आणि भव्य पाच घुमट उत्तम नजराणा आहे.
 
राम राजा मंदिर, ओरछा (मध्य प्रदेश)
हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे श्रीरामाला 'देव' म्हणून नाही तर 'राजा' म्हणून पूजले जाते. येथे श्रीरामाला दररोज 'गार्ड ऑफ ऑनर' (पोलीस सलामी) दिला जातो. हे मंदिर एकेकाळी बुंदेलखंडच्या राजाचा महाल होता. असे मानले जाते की भगवान राम दिवसा ओरछामध्ये राजा म्हणून राहतात आणि रात्री अयोध्येला परततात.
 
भद्राचलम सीतारामस्वामी मंदिर (तेलंगणा)
याला 'दक्षिण अयोध्या' म्हणून ओळखले जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर अत्यंत प्राचीन आणि पवित्र आहे. येथील मूर्ती 'वैकुंठ राम' स्वरूपात आहे, जिथे श्रीरामाच्या हातात शंख आणि चक्र देखील पाहायला मिळते. १७ व्या शतकात भक्त कंचर्ला गोपन्ना (रामदास) यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
 
 कनक भवन मंदिर, अयोध्या (उत्तर प्रदेश)
अयोध्येतील हे मंदिर अत्यंत सुंदर आणि सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेले आहे. असे मानले जाते की हे भवन माता कैकेयी यांनी देवी सीतेला लग्नानंतर 'मुह दिखाई' (भेट) म्हणून दिले होते. येथील श्री राम आणि सीता माता यांच्या मूर्तींनी सोन्याचे मुकुट धारण केलेले असतात, त्यामुळे याला 'सोन्याचे घर' असेही म्हणतात.
 
कोदंडराम मंदिर, रामेश्वरम (तमिळनाडू)
हे मंदिर समुद्राच्या मधोमध धनुष्कोडी येथे स्थित आहे. रामायणातील ऐतिहासिक घटनांशी याचा जवळचा संबंध आहे. असे मानले जाते की याच ठिकाणी बिभीषण प्रभू श्रीरामांना शरण आला होता आणि रामाने त्याचा राज्याभिषेक केला होता. १९६४ च्या मोठ्या चक्रीवादळातही हे मंदिर सुरक्षित राहिले होते.
 
इतर काही महत्त्वाची मंदिरे-
नाशिकचे काळाराम मंदिर (महाराष्ट्र): जिथे रामाने वनवासाचा काळ (पंचवटी) व्यतीत केला होता.
त्रिप्रायर श्रीराम मंदिर (केरळ): हे केरळमधील चार प्रमुख राम मंदिरांपैकी (चारधाम) एक आहे.
पुढील लेख
"मी मनाने देशभक्त आहे," असे म्हणत अर्जुन रामपालने 'धुरंधर २' मधील भारतविरोधी डायलॉग बद्दल माफी मागितली