संबंधित माहिती
- Mardaani 3 मर्दानीला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यशराजची मोठी घोषणा, राणी मुखर्जी लवकरच 'मर्दानी 3' मध्ये दिसणार
- श्रेयस तळपदे का म्हणाले- 'मी जिवंत आहे'? पोस्ट शेअर करून हे लिहिले
- एक दिवस लेखकाला सुपरस्टारपेक्षा जास्त पैसे मिळतील', हे म्हणणं खरं करून दाखवणारे सलीम-जावेद
- सैफ अली खान 'रेस 4' मध्ये जोरदार पुनरागमन करण्यास सज्ज!
- विकी कौशलचा 'छावा' आणि 'पुष्पा 2' मध्ये टक्कर, टीझरवर कतरिनाची प्रतिक्रिया
तारक मेहता का उल्टा चश्मा मधील अब्दुल अचानक गायब, शरद सांकला यांनी देखील सोडला का शो?
प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करीत आहे. या मालिकेला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले.
तसेच अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली व त्यांच्या जागी नवीन कलाकारांनी एंट्री केली. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकामधून आणखी एका कलाकाराने काढता पाय घेतला का? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोड मध्ये अब्दुल ची भूमिका साकारणारे शरद सांकला अचानक गायब झाले आहे.
पूर्ण गोकुळधाम सोसायटी अब्दुलला घेऊन चिंतीत दिसत आहे. पूर्ण सोसायटी अब्दूलला शोधत आहे. यामुळे चाहते तर्क लावत आहे की, कदाचित शरद सांकला यांनी देखील शो सोडला का?
तसेच यापूर्वी देखील गोली ची भूमिका साकारणारे कुश शाह हे जेव्हा शो बाहेर झाले होते तेव्हा असेच दाखवण्यात आले होते की गोली बेपत्ता झाला आहे. पण नवीन गोली ची एंट्री झाली. आता येणाऱ्या एपिसोड मध्ये माहित पडेल की, शरद सांकला या शो चा भाग आहे की नाही.
पुढील लेख
