शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (12:17 IST)

Mardaani 3 मर्दानीला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यशराजची मोठी घोषणा, राणी मुखर्जी लवकरच 'मर्दानी 3' मध्ये दिसणार

यशराज फिल्म्सची मर्दानी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी महिला-प्रधान फ्रेंचायझी आहे, आणि या सर्वप्रिय पोलिस फ्रेंचायझी च्या 10व्या  एनिवर्सरी  निमित्त कंपनीने या चित्रपटाच्या पुढील अध्यायाची झलक दाखवली आहे.

मर्दानी चा पहिला भाग 2014 मध्ये प्रदर्शित झाला आणि 2019 मध्ये या चित्रपटाचा सिक्वल आला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी केली आणि त्यांचा एक मोठा फॅनबेस आहे.
 
राणी मुखर्जीने या फ्रेंचायझीमध्ये शिवानी शिवाजी रॉय या निडर आणि धाडसी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, जी नेहमीच योग्य गोष्टींसाठी उभी राहते आणि खंबीरपणे न्याय मिळवून देते.
 
मर्दानी लिंगभेदाच्या मान्यतांना धक्का देत दाखवते की एक महिला पुरुषप्रधान व्यवस्थेत  कशाप्रकारे पुढाकार घेऊन नेतृत्त्व करू शकते आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी गरजूंना वाचवण्यासाठी पुढे येऊ शकते.