शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (07:54 IST)

श्री सांवरिया सेठ चित्तोडगढ

sanwariya seth
मेवाडचे प्रसिद्ध कृष्ण धाम श्री सांवरिया मंदिर राजस्थान मधील भक्ति, शक्ति, पराक्रम आणि बलिदानसाठी जगप्रसिद्ध ऐतिहासिक जिल्हा चित्तोडगढच्या मंडफिया गावामध्ये आहे. इथे देशभरातून भक्त दर्शनासाठी येतात. 
 
इतिहास-
ऐतिहासिक मान्यतेनुसार, भगवान श्री सावरियाजींच्या या चमत्कारिक मूर्तीच्या लोकप्रिय दंतकथा प्रसिद्ध आहे. मेवाडचा शासक राणा संग्राम सिंह यांचा बाबरशी युद्धानंतर 1584 मध्ये मृत्यू झाला. तसेच संत मीराबाईचा पती भोजराजही लग्नानंतर केवळ आठ वर्षे जगला. तिच्या आई-वडिलांचेही निधन झाले आणि मीराबाई एकटी राहिली. तसेच त्या वेळी ऋषी-मुनींचा समूह देशाच्या विविध भागांत फिरत मेवाड भागात आला. या ऋषी-मुनींजवळ गिरधर गोपाळ श्री सावरियाजींच्या चार मूर्ती होत्या. या मूर्तींची दररोज संपूर्ण धार्मिक विधी करून पूजा केली जात होती आणि भजन आणि कीर्तन केले जात होते.  
 
या श्री सांवरियाजींच्या चार मूर्तींपैकी एक छोटी मूर्ति ने मीराबाईचे मन आकर्षित केले. त्या या देखण्या श्री सांवरियाजींच्या मूर्तीला पाहतच राहिल्या. तसेच मीराबाई तिची वीणा वाजवायची, नाचायची आणि भजने व कीर्तन गात गायची. नंतर ती वृंदावनला गेली. तिथे भक्तीचा प्रसार करीत नंतर द्वारका येथे गेली जिथे भक्तीचा प्रवाह वाहत ती भगवान श्री द्वारकाधीशमध्ये विलीन झाली.
 
पौराणिक कथांनुसार सुमारे 250 वर्षांपूर्वी मांडफिया गावातील रहिवासी भोलीराम गुर्जर नावाच्या गुराख्याला बागुंड गावाच्या छपरावर असलेल्या वटवृक्षाखाली चार मूर्ती जमिनीत गाडल्या गेल्याचे स्वप्न पडले. व खड्डा खणण्यात आला. तर त्यामध्ये चार मूर्ती आढळल्या. या चार मूर्तींपैकी एक मूर्ती खड्डा खोदताना तुटली आणि त्याच खड्ड्यात गाडली गेली. तसेच राहिलेल्या तीन मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. परस्पर चर्चेनंतर या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती बागुंद आणि दुसरी मूर्ती भाडसोडा गावात आणण्यात आली तर तिसरी सुंदर मूर्ती मंडफिया गावातील नागरिकांनी मोठ्या थाटामाटात आणली. श्री सांवरिया सेठ यांचा जयजयकार केला. तसेच भक्त भोलीराम गुर्जर यांच्या घराच्या व्हरांड्यात श्री सांवरियासेठजींची मूर्ती तात्पुरती ठेवण्यात आली होती. मांडफिया या गावातील भक्त भोलीराम यांच्या घरी तात्पुरती ठेवण्यात आली. 
 
तसेच चमत्कारिक मूर्ती म्हणून लोकांमध्ये ती स्वीकारली जाऊ लागली. दिवसेंदिवस प्रभू श्री सांवरियाजींच्या दर्शनासाठी भक्तांची संख्या वाढत असताना गावातील मंडफिया व आजूबाजूच्या सोळा गावांतील प्रमुख भाविकांशी चर्चा करून ही चमत्कारिक मूर्ती भक्त भोलीराम गुर्जर यांच्या ओसरीतून काढण्यात आली व पूजा केल्यानंतर भक्त भोलीरामच्या घराजवळ मातीचे मंदिर बांधून त्याची स्थापना करण्यात आली. नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
 
मंदिरातील प्रमुख धार्मिक उत्सव-
श्री सांवरियाजी सेठ मंदिरामध्ये वर्षभर विविध पारंपरिक धार्मिक उत्सवांचे आयोजन केले जाते. मुख्यता जन्माष्टमी, एकादशी, दिवाळीनिमित्त तीन दिवसीय भव्य जत्रेचे आयोजन केले जाते व अन्नकूट एकादशी, निर्जला एकादशी, देवशयनी एकादशी, होळी, शरद पौर्णिमा, वसंत पंचमी महाशिवरात्री इत्यादी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्दशीला श्री सांवरियासेठांचा खजिना म्हणजे दानपेटी उघडली जाते. तसेच दर महिन्याच्या अमावस्येला महाप्रसाद भक्तांना वाटला जातो. 
 
श्री सांवरिया सेठ मंदिर कसे जावे?
सर्वात पहिले राजस्थानच्या चित्तौगढ किंवा उदयपुर जावे लागेल. तिथून श्री सांवरिया सेठ मंदिर मण्डफिया करिता बस किंवा टॅक्सीने जावे लागेल.