रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (07:00 IST)

रंग बदलणारे पँगॉन्ग सरोवर लडाख

Pangong lake
Pangong Tso Lake: लडाख मधील पँगॉन्ग सरोवर हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. तसेच भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी लडाख हे महत्वाचे पर्यटनस्थळ मानले जाते. लडाख मधील पँगॉन्ग सरोवर हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या सरोवराचे रंग बदलते पाणी पर्यटकांना आकर्षित करते.  
 
जगातील सर्वात उंचावर असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून पँगॉन्ग सरोवर ओळखले जाते. तसेच  पँगॉन्ग सरोवर आपले नैसर्गिक दृश्य आणि अप्रतिम सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. चारही बाजूंनी पर्वतांनी घेरलेले पँगॉन्ग सरोवर मध्ये पारदर्शी निळे पाणी आहे. हेच निळे पाणी पर्यटकांना भावते.
 
तसेच हे सुंदर आणि मनमोहक पँगॉन्ग सरोवर आपल्या रंग बदलत्या पाण्यामुळे देखील ओळखले जाते. वेगवगेळ्या वेळी पँगॉन्ग सरोवर चे पाणी निळे, हिरवे आणि लाल दिसते. असे सूर्य प्रकाश आणि बदलते वातावरण यामुळे होते. नैसर्गिक या आश्चर्यकारक दृश्याला पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटकांची इथे गर्दी होते.
 
भारत-चीन सीमेवर असलेले हे पँगॉन्ग सरोवर आपल्या सौंदर्यांनी अनेकांना भुरळ घालते. तसेच इथे अनेक चित्रपटांचे देखील शूटिंग होते. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या पँगॉन्ग सरोवराच्या सुंदर वैभवाची प्रशंसा करण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक लेहमध्ये दाखल होतात. तसेच पर्यटक या हिमालयीन सरोवराचे सौंदर्य आपल्या डोळ्यात टिपतात.
 
हिवाळयात हे सरोवर पूर्णपणे गोठून जाते. हिवाळ्याच्या काळात संपूर्ण तलाव गोठलेला असूनही, येथे स्थलांतरित पक्ष्यांच्या काही प्रजाती पाहायला मिळतात. तसेच भारतातील सर्वात प्रमुख पर्यटन आणि प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत पँगॉन्ग सरोवर सहभाग आहे.
  
पँगॉन्ग सरोवर लडाख जावे कसे?
रस्ता मार्ग-  
मनाली आणि श्रीनगर काही अंतरावर पँगॉन्ग सरोवर आहे. मनाली-लेह राष्ट्रीय राजमार्ग आणि श्रीनगर-लेह राष्ट्रीय राजमार्ग वरून टॅक्सी किंवा कॅब ने काही वेळातच पँगॉन्ग सरोवर जवळ पोहचता येते.
 
रेल्वे मार्ग- 
पँगॉन्ग सरोवर पर्यंत पोहचण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन जम्मू चे जम्मू तवी स्टेशन आहे. इथून कॅब किंवा टॅक्सीने सरोवर पर्यंत पोहचता येते. 
 
विमान मार्ग- 
पँगॉन्ग सरोवर पाहण्यासाठी विमानमार्गाने देखील जाऊ शकतात. पँगॉन्ग सरोवर जवळचे विमानतळ आहे  लेह-लडाखचे कुशक बकुला रिनपोछे एयरपोर्ट हे आहे. विमान तळावरून कॅब करून सरोवर पर्यंत पोहचता येते.