शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (15:10 IST)

माता ब्रह्मचारिणी मंदिर काशी

devi mandir kashi
शारदीय नवरात्रीमध्ये देशातील सर्व देवी मातेच्या मंदिरात भक्तांची गर्दी पाहवयास मिळते. भारतात नवरात्री या उत्सवाला विशेष महत्व आहे. तसेच भारतात अनेक जागृत देवी मंदिरे आहे. त्यापैकीच आहे माता ब्रह्मचारिणी मंदिर जे उत्तर प्रदेशातील कशी मध्ये स्थित आहे. नवदुर्गा पैकी माता ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. तसेच नवरात्रीचा दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीला समर्पित आहे.  
 
ब्रह्मचारिणी मंदिर-
माता ब्रह्मचारिणीचे प्रसिद्ध मंदिर कशी मध्ये स्थित आहे. भगवान शंकरांना आपल्या पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने माता ब्रह्मचारिणी रूपात कठीण तपश्चर्या केली होती. यामुळे देवी सृष्टीवर ब्रह्मचारिणी नावाने ओळखली जाऊ लागली. याकरिताच महादेवाची नगरी काशीमध्ये माता ब्रह्मचारिणीचे   मंदिर स्थित आहे. हे मंदिर खूप भव्य आणि सुंदर आहे.
 
नवरात्री मध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने भक्त इथे दर्शनासाठी येतात. तसेच येथील अशी मान्यता आहे की, जो पण भक्त नवरात्रीच्या दिवशी येथे डोक टेकवून दर्शन घेतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच देवीचा आशीर्वाद भक्ताला मिळतो. तसेच त्याच्या जीवनात सुख आणि समाधान टिकून राहते. तसेच माता ब्रह्मचारिणी मंदिर फक्त काशीमध्येच नाही तर अनेक ठिकाणी सुद्धा स्थापित आहे.
 
तसेच कशी मधील गंगा किनारी बालाजी घाट वर स्थित असलेल्या या माता ब्रह्मचारिणी मंदिर मध्ये नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होती.  
 
Maa Brahmcharini
तसेच असेच म्हणतात की, माता ब्रह्मचारिणी देवीचे दर्शन घेतल्याने परब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्मचारिणी मताच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडल आहे. देवीचे हे रूप खूप सुंदर आहे.
 
काशी मधील ब्रह्मचारिणी मंदिरात केवळ स्थानिक लोकच दर्शनासाठी येत नाहीत, तर इतर राज्यातील  भक्त देखील दर्शनासाठी आणि पूजेसाठी येतात. असे मानले जाते की ज्यांना मताचे हे रूप दिसते त्यांना संततीचे सुख मिळते. माता आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. 
 
ब्रह्मचारिणी मंदिर काशी जावे कसे?
विमान सेवा- मंदिरापासून वाराणसी विमानतळ सुमारे 30 किमी अंतरावर आहे. विमानतळावरून तुम्ही कॅब किंवा टॅक्सीच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहचू शकतात.
 
रेल्वे मार्ग- मंदिरापासून कँट रेल्वे स्टेशन म्हणजे वाराणसी जंक्शन 8 किमी अंतरावर आहे. स्टेशनवरून तुम्ही कॅब किंवा रिक्षाच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहचू शकतात.