रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 2 एप्रिल 2017 (23:14 IST)

‘बॅँकचोर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

यशराज बॅनरनिर्मित ‘बॅँकचोर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक  रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असून, तो एका साधू बाबाची भूमिका साकारत आहे. मध्यंतरी अशी चर्चा पसरली होती की, कपिल शर्मा याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून, त्याला यासाठी साइनदेखील करण्यात आले. परंतु रिलीज झालेल्या फर्स्ट लुकमध्ये रितेश झळकल्याने या चर्चांना आता पूर्णविराम बसला आहे. ‘बॅँकचोर’चे मोशन पोस्टर रिलीज करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गणपती बाप्पा मोरया लेट्स रॉक!’ यशराज बॅनरअंतर्गत बनविण्यात आलेला हा रितेशचा पहिलाच चित्रपट आहे.