1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. wax-statue-of-deepika-padukone-in-madame-tussauds

मादाम तुसाद वॅक्स म्युझियममध्ये दीपिका पदुकोण

लंडन येथील प्रसिद्ध मादाम तुसाद वॅक्स म्युझियम जगभरातल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे तिथे साकारले जातात. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत अशा अनेक हिंदुस्थानींचे पुतळेही या संग्रहालयात आहेत. मात्र, आता बॉलिवूडची मस्तानी किंवा पद्मावती अशी ओळख असणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा मेणाचा पुतळा लवकरच लंडन येथील मादाम तुसाद संग्रहालयात साकार केला जाणार आहे. खुद्द दीपिकानेच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे आता या नामवंतांच्या मांदियाळीत दीपिका पदुकोण या सौंदर्यवतीचा मेणाचा पुतळाही संग्रहालयात पाहायला मिळणार आहे.