बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जुलै 2018 (08:10 IST)

सिंगापूरच्या मॅडम तुसादमध्ये अनुष्काचा खास पुतळा

अनुष्का शर्माचा सिंगापूरच्या मॅडम तुसाद म्युझियममध्ये लागणारा पुतळा खास आहे. हा पुतळाअ इतर भारतीय सेलिब्रिटींच्या तुलनेत थोडा हटके आहे. कारण हा पुतळा हालचाल करणार आहे. बोलनार्‍या अनुष्काच्या स्वरूपात हा पुतळा साकारला जाणार आहे. अनुष्काच्या हातामध्ये फोन असेल तर हा पुतळा येणार्‍या लोकांना अभिवादनही करणार आहे. अशाप्रकारचा पुतळा असलेला अनुष्का ही पहिली भारतीय सेलिब्रिटी आहे. 
 
अनुष्का शर्माची जगभरात असलेली तिची फॅनफॉलोविंग पाहता सिंगापूरच्या मॅडम तुसाद म्युझियममध्ये अनुष्काचा पुतळा हटके अंदाजात साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरचा पुतळा ऑप्रा विन्फ्रे, क्रिस्टिआनो रोनाल्‍डो, लुइस हैमिल्‍टन अशा इंटरनॅशनल सेलिब्रिटींसोबत अनुष्काचा पुतळाअ उभा राहणार आहे.