1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जुलै 2015 (12:54 IST)

परिणिती होतेय नवीन घरात शिफ्ट!

parinita chopra
अभिनेत्री सोनम कपूरने अलीकडेच नवीन घर खरेदी केल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली. आता सोनम पाठोपाठ अभिनेत्री परिणिती चोप्रानेसुद्धा नवीन घर खरेदी केल्याची बातमी आहे. होय, परिणितीने मुंबईतील घार परिसरात 4 बीएचके सी फेसिंग अपार्टमेंट खरेदी केले आहे. 22 कोटींमध्ये तिने आपला नवा आशियाना खरेदी केला आहे. शिफ्टिंगमध्ये परिणितीला मदत करण्यासाठी तिची आई रीना अंबालाहून मुंबईत आली आहे. परिणितीचे दोन छोटे भाऊ सहज आणि शिवांगसुद्धा तिला सामानाची बांधाबांध करण्यात मदत करत आहेत. परिणितीने आपल्या जुन्या घरातील सर्व सामान नवीन घरात शिफ्ट केले आहे.
 
सामानाची बांधाबांध करतानाची काही छायाचित्रे परिणितीने सोशल नेटवर्किग साइटस्वर शेअर केली आहेत. त्यासह तिने ट्विट केले, ‘aaaaaaaand I'm packing!!!! Time to go to my new home and make new memories!!!!Toooo Exciteddd!!! Carton boxes making me happyyyy' आवडते घर शोधण्यासाठी परिणितीला बरेच महिने लागले. रोज सकाळी दोन तास ती प्रॉपर्टी एजंटसोबत फिरुन घर शोधायची. अखेर खार परिसरात तिला आपला नवीन आशियाना गवसला. आपल्या नवीन घराविषयी परिणिती सांगते, घर खरेदी करण्यापूर्वीच मी निर्णय घेतला होता, की घर हे सी फेसिंग असावे. यासाठी मला बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर मला माझ्या स्वप्नातले घर गवसले आहे.