बीग बी लोकलमध्ये अवतरात तेव्हा...
कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी सुरु असलेल्या एका टीव्ही शोच्या शुटींगसाठी बीग बी अर्थात महानायक आयोजित कार्यक्रमात अमिताभ बच्चन रविवारी लोकलमध्ये अवतरले.
लोकलमध्ये गिटार वाजवून कर्करोगग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न सौरभ निमकर हा करीत आहे. आज की रात है जिंदगी या शोसाठी त्याचे शुटींग करण्यासाठी बच्चन यांनी लोकलचा प्रवास केला. कर्करोगग्रस्तांसाठी आर्थिक मदत गोळा करणारा निमकर आज की रात है जिंदगीमध्ये सहभागी होणार आहे.
त्याच्या या अनोख्या उपक्रमाची माहिती मिळाल्यावर भारावून गेलेल्या अमिताभ बच्चन यांनी त्याला सुखद धक्का द्यायचे ठरविले आणि काल सकाळी सीएसटी ते भांडूप दरम्यान त्याच्यासोबत चक्क लोकलने प्रवास केला.
