1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. मल्लिका साकारणार राधे माँ

मल्लिका साकारणार राधे माँ

भगवानाचा अवतार असल्याचे सांगणारी आणि सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक बड्या धेंडाना आपले भक्त बनविणारी राधे माँ सध्या भारतात खूपच चर्चेत आहे. या राधे माँच्या जीवनावर चित्रपट तयार केला जात असून त्यात राधे माँची भूमिका सेक्सबाँब अशी ओळख असलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत करणार आहे. 
 
मालिकाच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असल्याने चित्रपट जबदरस्त धमालीचा असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजित शर्मा करणार आहेत. त्यांनीच राधे माँच्या भूमिकेसाठी मल्लिकाबरोबर चर्चा झाली असल्याचे व मल्लिकानेही भूमिका साकारण्याची तयारी दाखविली असल्याचे सांगितले. मल्लिकाबरोबरच यात डॉली बिंद्रा, नेहा धुपिया, राहुल महाजन हेही झळकणार आहेत. राहुल महाजन यांनीच राधे माँचे बिंग फोडले आहे. चित्रपटाला बप्पी लाहिरी संगीत देणार आहेत.