1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (11:07 IST)

राणी मुखर्जी बनली कव्हर गर्ल

rani mukharjee
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने अलीकडेच एक फोटोशूट केले आहे. फॅशन मासिक व्होगसाठी तिने हे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. मासिकाचा हा अंक ऑगस्ट 2015 साठी तयार करण्यात आला आहे.

याचे टायटल ‘द एज (लेस) इश्यू’ असे आहे. राणीने फोटोशूटमध्ये इटालिअन डिझाइनर ‘डोल्से अँड गब्बाना’ फ्लोअर ड्रेस परिधान केला होता. राणी मुखर्जीशिवाय 90च्या इतर लोकप्रिय अभिनेत्रीसुध्दा विविध मासिकांसाठी फोटोशूट केले आहे. त्यामध्ये राणीची कजिन काजोलने डिझाइनर नम्रता जोशीपुराच्या फ्लोअर एप्लिक कोट परिधान करून (ELLE)च्या ऑगस्ट अंकासाठी पोज दिल्या. तसेच ऐश्वर्या राय बच्चनने दोन विविध मासिकांसाठी फोटोशूट केले. ‘हॅलो’ मासिकाच्या 190 व्या आवृत्तीमध्ये ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली. तसेच बाजार ब्राइडच्या कव्हर पेजच्या सब्यासाचीचा ड्रेसमध्ये एलिगेंट दिसली.