1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. सोनम ‘किम के’च्या वाटेवर

सोनम ‘किम के’च्या वाटेवर

अमेरिकेत रिलिटी स्टार किम कार्डिशनची जबरदस्त क्रेझ आहे. सध्या बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूरची वाटचालही किम केच्या मार्गावर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण मोबाइल एप लॉन्च करणारी सोनम ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. 
 
काही महिन्यांपूर्वी ‘किम के’ने स्वत:चे मोबाइल एप लॉन्च केले होते. एपला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. हा प्रतिसाद इतका प्रचंड होता की एपची सिस्टीमही काही वेळा कोलमडण्याच्या मार्गावर आली होती. आता ‘किम के’च्या वाटेने जात सोनमनेही स्वत:चे मोबाइल एप लॉन्च केले आहे. हे एप एप्पल आणि अँड्राइॅडवर उपलब्ध आहे. या एप वर सोनम फिटनेस टिप्स, फॅशनबद्दलची माहिती, लाईव्ह चॅट, चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देणार आहे. सोनमचे एक्सक्लुझीव्ह फोटो या एप वर उपलब्ध असणार आहेत. 
 
सोशल मीडियावर फॅन्ससोबत संपर्क ठेवण्यात सोनम आघाडीवर आहे. अभिनयाच्या जोडीनेच तिची ओळख फॅशन आयकॉन म्हणून झाली आहे. आता स्वत:चे एप लॉन्च करून तिने यातही आघाडी घेतली आहे. सोनमचे सध्या ट्विटरवर 8.91 दशलक्ष, इन्स्टाग्रामवर 5.1 दशलक्ष आणि फेसबुकवर 14 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
 
पुढील लेख
सनीला शार्कसोबत सैराट पोहायचंय!