1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
  4. पोहेवडा (व्हिडिओ पहा)

पोहेवडा (व्हिडिओ पहा)

साहित्य: 1 वाटी पोहे, 1 वाटी उकळून मॅश ‍केलेला बटाटा, 1 चमचा आले मिरचीची पेस्ट, 1 लहान चमचा बडीशेप, कोथिंबीर, तिखट, हळद, गरम मसाला, मिरपूड, धणेपूड, मीठ, तेल.
 
कृती: पोहे पाण्यात धुऊन निथळून घ्या. एका भांड्यात पोहे, मॅश केलेले बटाटे, आले मिरची पेस्ट, बडीशेप, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, मिरपूड, धणेपूड मिसळून घ्या. कोथिंबीर टाका. आता आपल्या आवडीप्रमाणे आकार देऊन वडे तयार करून गरम तेलात तळा. लसणाच्या हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.