1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल

अशा ठेवा डायनिंग रूममधील वस्तू

NDND
फेंगशुईच्या दृष्टीकोनातून डायनिंग रूमचा विचार करता या रूममधील वस्तूंचाही विचार प्रकर्षाने केला जातो. डायनिंग रूममधील विविध वस्तूंची जागा कुठे असावी यासंबंधीचा दिशा निर्देशही फेंगशुई करते.

डायनिंग टेब
डायनिंग रूममध्ये डायनिंग टेबल ही सर्वात जास्त महत्त्वाची वस्तू असते. हे टेबल जितके साधे असेल तितके उत्तम. या टेबलाचा आकार आयताकृती, गोलाकृती किंवा चौकोन असावा. हा टेबल काचेचा किंवा कृत्रिम धातूचा असण्यापेक्षा लाकडी असायला हवा. कारण लाकूड नैसर्गिक असल्यामुळे यीन शक्तीचा संचार करते. आयताकृती व वर्गाकृती टेबलापेक्षा गोल किंवा अंडाकृती टेबल चांगले मानले जाते. आयताकृती किंवा वर्गाकृती टेबलावर दोन व्यक्ती समोरासमोर बसल्या तर त्यांच्यात मतभिन्नता आढळून येते. गोलाकार टेबल विचारांच्या देवाण- घेवाणात चांगल्या वातावरणाची निर्मिती होते. या रूममध्ये फर्निचरची गर्दी न करता फक्त टेबल व खुर्च्या ठेवाव्यात.

जेवणाच्या खुर्च्य
जेवणारे सर्वचजण सुटसुटीत बसू शकतील अशा जेवणाच्या खुर्च्या मांडाव्यात. कोनाकार खुर्च्या नकोत. कारण कोनाकार खुर्च्या यांग शक्तीच्या प्रतीक मानल्या जातात. ही शक्ती लोकांना जास्त क्रियाशील बनविते. गोलाकार खुर्च्या यीन शक्तीचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे जेवणार्‍यांच्या आपसातील चर्चा हळू तसेच कमी लाभाच्या सिध्द होतात. त्याचप्रमाणे जेवतांना रोज एकाच जागी न बसता बसण्याची जागा बदलत रहावी.

NDND
जेवणाच्या टेबलावरील सामा
जेवणाच्या टेबलावर ठेवण्यात येणारे सामानही महत्त्वाचे असते. टेबलावर ठेवण्यात येणाऱ्या क्रॉकरीचा आकारही महत्त्वाचा असतो. आयताकार, अंडाकृती, चौकोन व गोलाकार आकारातील क्रॉकरी फेंगशुईनुसार उत्तम मानली जाते. कटलरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. फक्त ती पॉलिश केलेली हवी. टेबलावरील चटई टेबलाच्या आकारानुसारच घ्या. जर टेबल अंडाकृती असेल तर चटई अंडाकृतीच घ्या. चटईचा रंग त्या रूमच्या रंगाला शोभेल असा निवडा.

फेंगशुई व डायनिंग रूम
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा