''42 कि.मी'' नॉनस्टॉप दौड
|
दिग्दर्शक - निशा चैनानी
कलाकार - प्रशांत चैनानी, बिक्रम सलूजा, मंदिरा बेदी, समीर दत्तानी, पूरब कोहली, नौहीन सरदार अली, दारा सिंह
जीवनात आपण सर्व कशाच्या ना कशाच्या मागे धावत असतो. कोणी प्रेमाच्या मागे तर कोणी पैशाच्या मागे, कोणाला शांती हवीय तर कोणाला हास्य हवे आहे. जीवन नेहमीच फास्ट ट्रॅकवर चालत असते.
|
आपले घर भले आणि आपण भले अशी संजना (मंदिरा बेदी) ही गृहिणी आहे. घर, दोन मुले आणि पती इतक्यापूरतेच तिचे जीवन मर्यादीत आहे. आपली वेगळी ओळख नसल्याची जाणीव तिला होते आणि ती 42 किलोमीटर्सच्या स्पर्धेत सहभागी होते.
रवी आनंद (बिक्रम सलूजा) च्या जीवनात केवळ पैशाला महत्व आहे. काम, काम आणि यशाची नशा त्याच्यात संचारलेली असते. कोणासाठीही त्याच्याकडे वेळ नाही. एकदिवस त्याच्यावरही अशी वेळ येते की त्याची कल्पनाही केलेली नसते आणि आपला विश्वास कायम राखण्यासाठी त्यालाही 42 किमी.च्या मोठ्या दौडीत सहभागी व्हावे लागते.
राजू (पूरब कोहली) हा खेडेगावात रहाणारा आहे. या शेतक-याच्या मुलाच्या जीवनात सौमित्रा ही मुलगी येते. पण, त्याची ओळख नसल्याने सौमित्राचे वडिल लग्नाला नकार देतात. स्वत:ला सिध्द करण्याच्या इर्षेने राजू प्रेरीत होते. आणि तो ही या दौडीत सहभागी होतो.
गोव्यात रहाणारा संजीव (समीर दत्तानी) फुटबॉल खेळाडू आहे. देशातील अव्वल फुटबॉलपटू बनण्याचे त्याचे ध्येय असते. त्याचा आत्मविश्वास तुटतो पण, तो सहजासहजी हार मानत नाही
समीर (प्रशांत चैनानी) हॅडसम युवक आहे. त्याला जे पाहिजे ते काहीही करून मिळवतोच. तो मुलींमध्ये लोकप्रिय आहे. दिव्या या मुलीच्या प्रेमात पडल्यावर त्याचे जीवन बदलून जाते. आपल्याला सिध्द करण्यासाठी तो 42 किमीच्या स्पर्धेत सहभागी होतो.
मुंबई इंटरनेशनल मॅराथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्या जीवनात काय बदल होतो ते पाहण्यासाठी पहा '42 कि.मी.'
