नवशा गणपती
अमित यादव, नाशिक
|
गोदावरीच्या तीरी पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेशमूर्ती आहेराघोबादादांनी आनंदवलीस मोठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यास नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. पेशवाई बुडाल्यानंतर आनंदवलीचा वाडाही जाळला. मात्र, परिसरातील मंदिरे शाबूत राहिली. श्री नवशा गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकीर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे, अशी माहिती मंदिराचे गुरुजी श्री. शिवाजी बिडकर यांनी दिली.
सन १९८८ मध्ये कै. युवराज जाधव व आनंदवल्ली परिसरातील नागरिकांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. गोदातीरी असलेल्या मंदिरास वारंवार पुराचा तडाखा बसत असल्याने या मंदिराचा जीर्णोध्दार करणे अपरिहार्य होते. सन १९९० च्या कालखंडात संत श्री गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरात अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली. संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थीस या मंदिरात अतिशय गर्दी असते. याप्रसंगी मंदिर प्रशासनातर्फे ५००० किलोच्या महाप्रसादाचे वाटप होते. निसर्गरम्य असलेल्या मंदिर परिसरात अभिषेक, सत्यनारायण पूजा करण्याची सुविधा संस्थेने केली आहे.
श्री नवशा गणपतीमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच 'हजरत पीर सय्यद संझेशाह हुसैनी शहीद' यांची दरगाह आहे. दरगाह व मंदिर जरी शेजारी असले तरी त्यांच्यात आजतागायत कधीही वाद झाला नाही. या दोन्ही संस्थांमार्फत 'रामरहिम' मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ती धार्मिक कार्यक्रम करणारी संस्था नसून त्याद्वारे सामाजिक कार्य केले जाते. असे श्री नवशा गणपती मंदिराचे अध्यक्ष श्री. राजेंद्रशेठ जाधव यांनी सांगितले.
