1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. 'आप'चा एक कप चहा पाच हजार रुपयांचा!

'आप'चा एक कप चहा पाच हजार रुपयांचा!

aap party
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनिधी जमा करण्यासाठी आम आदमी पक्षाने (आप) आता 'चहा पार्टी'चे आयोजन केले आहे. यापूर्वी 'आप'ने 'डिनर विथ केजरीवाल'ची शक्कल लढविली होती. विशेष म्हणजे या चहा पार्टीत एक कप चहासाठी तब्बल पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या 29 मार्च रोजी गुरगाव मतदार संघात हा 'चहा पार्टी'आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असले, तर पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत. कार्यक्रमात 'आप'नेते योगेंद्र यादव हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.