1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. 'आप'ची तिसरी यादी जाहीर

'आप'ची तिसरी यादी जाहीर

नवी दिल्ली- आम आदमी पक्षांने (आप) लोकसभा निवडणुकीसा‍ठी आपल्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. यादीत  61 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे स्टींग ऑपरेशन करणारे पत्रकार आशीष खेतान आणि  कर्नल देवेंद्र सहरावत यांना दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय 'आप'ने हरियाणातील चार आणि कर्नाटकातील 13,  पंजाबच्या तीन आणि उत्तरप्रदेशच्या 39 उमेदवार उभे केले आहेत. याबरोबर 'आप'ने आतापर्यंत 131 उमेदवारांच्या नावांची घोषणा  केली आहे.
 
नवी दिल्लीतून गुलेलचे पत्रकार आश‍िष खेतान यांना कॉंग्रेसचे खासदार अजय माकन यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. दक्षिण  दिल्लीतील कॉंग्रेसचे खासदार आणि 1984 मधील शिखविरोधी दंगलीतील आरोपी सज्जन कुमार यांचे बंधू रमेशकुमार यांच्या विरोधात  कर्नर सहरावत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आशिष खेतान यांची ओळख एक शोध पत्रकार म्हणून आहे. भाजप आणि नरेंद्र  मोदी यांच्या विरोधात अशिष यांनी स्टींग ऑपरेशन केले होते. गुतरातमधील एका महिलेची हेरगिरी करण्याच्या प्रकरणालाही आशिष  यांना वाचा फोडली होती. आशिष खेतान मथुरा सभेलाही उपस्थित होते.