1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. 'आप'च्या सोमनाथ भारतींना मारहाण?

'आप'च्या सोमनाथ भारतींना मारहाण?

आम आदमी पक्षाचे (आप) नेते सोमनाथ भारती यांच्या कारवर बुधवारी सायंकाळी अज्ञात  हल्लेखोरांनी तुफान दगडफेक केली. एवढेच नव्हे तर कारचालकालाही भारतींनाही मारहाण झाल्याचे  समजते. भारती एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. वाराणसीतून निवडणूक  लढणारे 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारार्थ सोमनाथ भारती येथे आले आहेत. 

दरम्यान, सोमनाथ भारती यांच्यावरील हल्ल्याशी संबंध नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता  रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे.