1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Girish Mahajans orders regarding the Bhiwandi building accident

भिवंडी इमारत दुर्घटना : मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

भिवंडीच्या नरपोली येथे इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला असून घटनास्थळी दाखल झालेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीच्या नरपोली येथील बालाजी नगरमधील गंगाराम वाडीत गुरुवारी रात्री उशिरा कोहिनूर अपार्टमेंट कोसळण्याच्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शुक्रवारी घटनास्थळी दाखल झालेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, भिवंडीसह संपूर्ण जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी रात्रभर चाललेल्या बचावकार्यात आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढले आहे. भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेने या इमारतीला यापूर्वी 'सी-श्रेणी'चा धोका म्हणून घोषित केले होते. 
 
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, निष्पक्ष आणि सखोल चौकशी केली जाईल. दोषी आढळलेल्या कोणत्याही अधिकारी किंवा व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. सरकार बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करेल.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
भिवंडी इमारत दुर्घटना वर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला, २ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा