1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. MLA s car accident on Solapur Dhule highway

भाजप आमदारच्या काफिल्यातील कारचा भीषण अपघात

सोलापूर-धुळे महामार्गावर जामखेड जवळ भाजप आमदार नारायण कुचे यांच्या काफिल्यातील फॉर्च्युनर कारचा भीषण अपघात झाला. अशी माहिती समोर आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील भाजप आमदार नारायण कुचे यांच्या फॉर्च्यूनर कारला सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर जामखेड फाटा (वाकाणाजवळ) येथे आज भीषण अपघात झाला आहे. तसेच आमदार नारायण कुचे आणि त्यांचे सहकारी छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी जात होते. माहितीनुसार जामखेड शिवारातील एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरून खाली उतरली आणि भीषण रितीने उलटली. 
अपघाताच्या वेळी आमदार नारायण कुचे स्वतः त्या कारमध्ये बसलेले नव्हते. ते दुसऱ्या वाहनात असल्याने या भीषण अपघातातून सुखरूप बचावले आहे. अपघात घडताच त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवून अपघातग्रस्त फॉर्च्यूनरच्या काचा फोडल्या आणि आत अडकलेल्या सहकाऱ्यांना बाहेर काढले. या अपघातात कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालन्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. आहे.  माहितीनुसार, सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे. 
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
आंदोलना दरम्यान अभिजीत दीपके यांनी अचानक उपोषण सोडले