संबंधित माहिती
- राज्यातील पूराबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा
- जॉर्डनचे माजी क्राऊन प्रिन्स हमजा बिन हुसैन नजरकैदेत
- कोरोनाचा कहर: फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाउन जाहीर, निर्बंध 4 आठवड्यांसाठी कायम राहतील
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला
- अमित शहा: सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगण्यासाठी नाही
इंडोनेशियात पूर आणि भूस्खलनात 50 जणांचा मृत्यू
पूर आणि भूस्खलनामुळे इंडोनेशिया आणि तिमोर लेस्टमध्ये आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुसळधार पावसामुळे प्रचंड पूर आला आहे. पूर्व इंडोनेशियात आणि शेजारील तिमोर लेस्ट परिसरात यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं आपात्कालीन यंत्रणांनी सांगितलं.
चार उपजिल्हे आणि सात गाव पुराच्या केंद्रस्थानी आहेत असं इंडोनेशिया डिझॅस्टर मिटिगेशन एजन्सीचे प्रवक्ते रादित्य जाती यांनी सांगितलं. 27 लोक बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं.
इस्ट फ्लोअर्स भागात 60 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र इंडोनेशियाच्या राष्ट्रीय यंत्रणांनी याला दुजोरा दिलेला नाही.
तिमोर लेस्ट भागात 11 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. भूस्खलन आणि पुराचा फटका बसलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे असं आपात्कालीन यंत्रणेनं सांगितलं.
