1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. preet bharara

प्रीत भरारा यांची हकालपट्टी; राजीनामा दिला नाही म्हणून मला काढून टाकले: प्रीत भरारा

preet bharara
भारतीय वंशाचे अमेरिकन अॅटर्नी प्रीत भरारा यांना ट्रम्प प्रशासनाने पदावरुन काढून टाकले आहे.
 
प्रीत भरारा यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याची संधी प्रशासनाकडून देण्यात आली होती परंतु आपण राजीनामा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
 
ही माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे.आपण आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला त्यामुळे आपणास व्हाइट हाऊसने काढून टाकले आहे असे ट्विट त्यांनी केले. अॅटर्नी म्हणून काम करणे हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठा सन्मान होता असे त्यांनी म्हटले आहे.
पुढील लेख
आता राष्‍ट्रपती ‘भाजप’च्याच पसंतीचाच होणार!