आता हवेपासून पाणी तयार करून प्या!
आपण कुणालाही भेटलं की काय हवापाणी कसं काय आहे, असं विचारतो. उद्या त्याचं उत्तर हवाही चांगली आहे नि तिचं पाणीही चांगलं आहे, असं उत्तर मिळालं तर गोंधळात पडू नका. कारण टेक्सॉसच्या एक कंपनीने हवेचं पाण्यात रूपांतर करणारं यंत्र शोधून काढलं आहे.
अत्याधुनिक तंत्राद्वारे बनविलेले हे यंत्र हवेतील आर्द्रता शोषून घेऊन त्याचं पाण्यात रूपांतर करते. या मशीमध्ये असलेले फिल्टर हवेतील प्रदुषित घटक बाजूला काढते आणि विविध प्रक्रिया करून आर्द्रतेचे पाण्यात रूपांतर करते.
एक्वामेकर्स या कंपनीच्या इस्त्रायल येथील शाखेने ही किमया केली आहे. 'हे यंत्र म्हणजे तुमची स्वतःची विहीर आहे, असं समजा आणि तिचं पाणीही स्वच्छ आहे, हेही लक्षात घ्या, असे या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एलिटा मार्कोव्हिट्स यांनी सांगितले.
यापुढच्या पाच ते दहा वर्षांत इस्त्रायल आपल्या नागरीकांना याद्वारेच पाणी पुरवेल असा विश्वास मार्कोव्हिट्स यांनी व्यक्त केला.
या यंत्राच्या सहाय्याने एकावेळी पाच हजार लिटर पाण्याची निर्मिती करता येईल, असा दावा कंपनीने केला असून, एवढे पाणी एका संपूर्ण गावाला पुरविण्यासाठी पुरेसे आहे, असे त्यांचे मत आहे.
सौरउर्जा उत्पादीत करणार्या यंत्रासोबत हे यंत्र वापरल्यास पर्यावरणदृष्ट्या ते उपयुक्त ठरेल. शिवाय पाणी टंचाई असलेल्या भागात पाण्याची बाटली घेऊन जाण्यापेक्षा हे यंत्र एक चांगला पर्याय मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.