1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

कराची पेटली, सात ठार

कराचीत वकिलांच्या दोन गटात झालेल्या दंगलीत सातजण ठार झाले. यात पाच जणांचा जाळण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सिंध उच्च न्यायालयातील बार असोसिएशन कार्यालयाजवळ वकिलांच्या दोन गटात वाद झाला या वादाचे पर्यवसान दंगलीत झाले यात अनेक वाहनांचे नुकसान करण्यात आले, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जीन्ना रोड वरील ताहिर प्लाझा या इमारतीलाच दंगेखोरांनी आग लावल्याने यातील पाच जणांचा जळून मृत्यू झाला.

तसेच इतर घटनांमध्ये दोन जणांना गोळ्या घालण्यात आल्याचे वृत्त आहे. मुशर्रफ आणि पंतप्रधान गिलानी यांनी शांतता राखण्याचे आवाहन जनतेला केले आहे.