1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

पाक पंतप्रधानपदावरून वाद

पाकिस्तान पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून आपले नाव जाहीर न केल्यामुळे आपला विश्वासघात केला असल्याचे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे उपाध्यक्ष मकदूम फहीम यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून फहीम यांच्या नावाला झरदारी यांनी पसंती दिली होती.

परंतु आघाडी पक्षातील काही नेत्यांकडून त्यांच्या नावाला विरोध होत असल्यामुळे फहीम यांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब झाला नाही. विनाकारण आपले नाव जाहीर करण्यास उशिर करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.