1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

पाकमधील वकील बंड करणार

पाकमधील वकील बंड करणार
न्यायाधीशांच्या पुर्नबहालीचे प्रकरण पाकमध्ये चांगलेच पेट घेत आहे. पीएमएलएनने गिलानी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पाकमधील वकिलांचाही असंतोष बाहेर पडत आहे.

त्यांच्या या असंतोषाचा सामना दस्तूरखुद्द परवेझ मुशर्रफ यांनाही करावा लागला होता. आता गिलानी सरकारही न्यायाधीशांच्या पुर्नबहालीसाठी विलंब लावत असल्याने वकील बंडाच्या तयारीत असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील बार कौन्सिलचे अध्यक्ष ऐतजाज अहसान यांनी दिली.

यासाठी येत्या 17 तारखेला वकिलांचा एक मेळावा इस्लामाबादेत होत आहे, यात आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
About Writer
वार्ता