1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

भेकड ''पाक पोलिस''

कोणताही लष्करी आधीकारी असो किंवा पोलिस दलात काम करणारा आधीकारी आणि शिपाई, तो प्रसंगी मरण पत्करतो पण दहशतवाद्यांच्या भितीने पाठ दाखवून पळून येत नाही. भारतीयांबद्दल तरी सर्वांना हा ठाम विश्वास आहे.

पण तालिबानी दहशतवाद्यांच्या भितीने पाक लष्करातील आधीकारी आणि पोलिसांची एवढी पळापळ चालली आहे की, त्यांच्या विरोधात लढाईवर जाण्या ऐवजी ते सुट्टी घेऊन मजा मारण्यात बहादुरी मानत आहेत.

अशा पळपुट्या बहादुरांवर मुशर्रफ यांनी स्वतः:च तलवार चालवली असून, वझिरिस्तानमध्ये सुरू असलेल्या सैन्य कारवाई दरम्यान सुटीवर गेलेल्या 50 पोलिसांना नोकरीतून निलंबित करण्यात आले आहे.

अफगाण सीमेलगत असलेल्या वझिरिस्तानात गेल्या काही दिवसांपासून पाक सैन्य आणि तालिबानी अतिरेक्यांचे जोरदार युद्ध सुरू आहे. यात 200 हून अधिक पोलिस आधीकारी प्रत्यक्ष लढत आहेत.

यातून मुक्तता होण्यासाठी काही जणांनी सुट्ट्या घेतल्या होत्या, त्यांना आत घरीच बसण्याचा सल्ला मुशर्रफ यांनी दिला आहे.