1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

महागाईचा चीनलाही फटका..

भारतात ज्याप्रमाणे सारे रेकॉर्ड तोडत महागाईदर पाचपर्यंत येऊन पोहचला आहे, अगदी त्याच प्रमाणात चीनमध्येही हा दर सातच्या घरात पोहचल्याने या महागाईचा चांगलाच फटका चीनला बसला आहे.

चीनचे पंतप्रधान वेन जियाबो यांनीही वाढत्या महागाई बद्दल चिंता व्यक्त केली असून, गेल्यावर्षी चीनने या दरावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचे केलेले प्रयत्न फोल ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकतेच त्यांनी चीनच्या संसदेत देशाच्या विकासाचा वार्षीक आढावा सादर केला. त्यात त्यांनी खाद्य तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याची कबुली दिली आहे.