1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

रशियात विमान अपघातात नऊ ठार

रशियातील उराल्स क्षेत्रातील चिलीबिंक्स शहराजवळ काल एक मालवाहू विमानाला झालेल्या अपघातात चालक दलासह विमानातील नऊ जण ठार झाले.

रशियातील परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एएन 12 नावाच्या या विमानाला उड्डाण केल्या नंतर अवघ्या काही क्षणातच अपघात झाला.
कॉकपीटमध्ये अचानक धूर दिसल्याचे अपघातापूर्वी वैमानिकांनी स्पष्ट केले होते अशी माहिती परिवहन विभागाने दिली होती.