1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

लाल मशीद भागात संचारबंदी

येथील लाल मशीद भागात लष्कराला तैनात करण्याबरोबरच संचारबंदी लागू करणयात आला आहे. सुरक्षा दल आणि मदरशाचे कट्टरपंथीय विद्यार्थी यांच्यात काल झालेल्या चकमकीत बारा जण मृत्युमुखी पडले होते. पन्नासाहून अधिक जण जखमी झाले. मशिदीची उलेमा व दहशतवादी विद्यार्थ्यांनी शरण यावे असे आवाहन सरकारने केले आहे.

राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्ऱफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वरील आवाहन करण्यात आले. शरण येणाऱ्यांना काहीही केले जाणार नाही, मात्र, हिंसाचार करणाऱ्यांना गोळीबाराने प्रत्युत्तर दिले जाईल, असे गृह राज्यमंत्री इक्बाल वाराईच यांनी सांगितले. या मशिदीच्या परिसरात मंगळवारी झालेल्या चकमकीत अकरा जण ठार झाले होते.