अडवाणी संघाचे गुलाम- सोनिया
भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घाबरत असून, ते संघाचे गुलाम असल्याची जळजळीत टीका करत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपला फटकारले आहे.
कर्नाटकात सोनियांनी कॉंग्रेसला मते देण्याचे आवाहन करतानाच भाजप आणि अडवाणी यांचा समाचार घेतला. अडवाणींना केवळ पंतप्रधानपदाची खुर्ची हवी असल्याने संघाच्या भुमिकेप्रमाणे ते वागत असल्याचा आरोप सोनियांनी केला.
भाजपच्या या नेत्याच्या मनात संघाबद्दल इतकी दहशत आहे की, संघाचे कोणतेही निर्णय टाळण्याची त्यांच्यात हिंम्मत नसल्याचे सोनिया म्हणाल्या. मनमोहन यांना कमकुवत पंतप्रधान म्हणून हिणवणे चुकीचे असल्याचेही सोनियांनी स्पष्ट केले.