1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मे 2020 (15:38 IST)

शाकाहारी लोकांना Corona संसर्ग, जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणतात

vegetarian people
आरोग्य विषयक तज्ज्ञ आणि भारतीय सार्वजनिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष प्रोफेसर के. श्रीनाथ रेड्डी यांचे म्हणणे आहे या दाव्याचे काही पुरावे नाही की शाकाहारी लोकांना कोविड विषाणूंचा संसर्ग होऊ शकत नाही. ते म्हणाले की शाकाहारी लोकांना देखील कोविड 19 संसर्गाची लागण झालेली आहे.
 
एम्स मधील हृदयविकार विभागाचे माजी प्रमुख म्हणाले की हे मात्र खरं आहे की आपल्या दैनंदिनीच्या आहारात फळे आणि भाज्यांचा प्रामुख्याने समावेश करणाऱ्या लोकांची रोग प्रतिकारक क्षमता चांगली असते. ते या संसर्गाशी चांगल्या प्रकारे लढू शकतात.
 
ते म्हणाले की शाकाहारी असो वा मांसाहारी लोकांनी आपल्या आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा प्रामुख्याने समावेश करावा. जेणे करून कुठल्याही संसर्गाशी लढण्यासाठी त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल. 
 
अनेक मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन अभ्यासात सहभागी असलेले डॉ रेड्डी म्हणाले की तोंड, नाक याच बरोबर आपले डोळे पण झाकणे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, हे विषाणू मुख्यतः चेहरा, नाक, तोंड किंवा डोळ्यांच्या माध्यमांतून शरीरात शिरतो. आपणं अनेकदा डोळ्यांना झाकणे विसरतो. 
 
रेड्डी म्हणाले, संक्रमित व्यक्तीच्या बोलण्याने किंवा शिंकल्याने त्याच्याकडून येणारे थेंब दुसऱ्याचा चेहऱ्यावर पडतात. तेव्हा ते थेंब डोळ्यांतून सुद्धा शरीरात जाऊ शकतात. कारण डोळे आणि नाक जुळलेले आहेत.
 
ते म्हणाले, आपण चष्मा घातलेला असल्यास योग्य ठरेल. या व्यतिरिक्त लोकं प्लास्टिकने पूर्ण चेहरा झाकण्याचा देखील सल्ला देत आहेत ज्याने आपल्या डोळ्यात काही ही पडता कामा नये.