मंगळवार, 3 मार्च 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: गुरूवार, 22 मे 2014 (12:37 IST)

अंकिता तुझे किती ते नखरे

#Ankitalokhande #Sushant #Marathi Cinema Masala
अंकिता लोखंडे म्हणजे टीव्हीतली ‘टँट्रक क्वीन’. ‘पवित्र रिश्ता’मध्ये ती जितकी सोज्वळ, सोशिक दिसते तितकी रिअल लाइफमध्ये ती अजिबातच नाही बरं. तिच्या नखर्‍यांचे अनेक किस्से इंडस्ट्रीत चर्चिले जातात. मग ते तिच्या सोयीने मालिकेत ब्रेक घेणं असेल किंवा पैसे वाढवून मागणं असेल, तिच्या या गोष्टी टीव्ही इंडस्ट्री का बच्चा बच्चा जानता है. बॉयफ्रेंड सुशांतसिंग राजपूतचा सिनेमा सुपरहीट झाल्यावर तर मॅडम ‘सातवे आसमाँ पर’च होत्या. एक मालिका हीट झाली की प्रोडय़ुसरच्या डोक्यावर नाचायलाच लागते बया. तर तिचं एक नवं नखरे प्रकरण सध्या समोर आलंय.

मॅडमच्या या नखर्‍यांमुळे एक शो हातचा गेला. एका क्रिकेट लीगच्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्मन्स देण्यासाठी अंकिताला विचारलं होतं. पण, तिचे नेहमीचे नखरे सुरू झाले. हेच हवं, तेच नको वगैरे वगैरे. मग पैसे वाढवण्याची मागणीही तिने केली. त्यात हो-नाही करत नंतर तेही ओके झालं. नंतर रविवारी शूट करण्याचं ठरलं. तर त्यातही तिचं टुमणं सुरूच. ती म्हणे, रविवारी शूट करत नाही. मग काय..शेवटी तिलाच बदलून टाकण्यात आलं. प्रोडय़ुसर, चॅनलवाले तरी किती ऐकणार ना. असंच करत राहिलीस तर तेलंही गेलं आणि तूपही अशी गत होईल बरं तुझी.