1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
  4. Some of the major temples of Maharashtra

Famous Temples in Maharashtra महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नसून वास्तुकलेचा अद्भूत नमुना

Maharashtra Tourism : महाराष्ट्राला मंदिरांची मोठी परंपरा लाभली आहे. येथील मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नसून ती वास्तुकलेचा अद्भूत नमुना आहे. तसेच महाराष्ट्रात प्रत्येक कोपऱ्यात इतिहासाची साक्ष देणारी भव्य मंदिरे आहे.  महाराष्ट्रातील काही प्रमुख मंदिरांची यादी आज आपण पाहणार आहोत जिथे नक्कीच भेट द्या. 

महाराष्ट्रात प्रत्येक कोपऱ्यात इतिहासाची साक्ष देणारी भव्य मंदिरे 

महाराष्ट्रातील काही प्रमुख मंदिरे 

१. पाच जोतिर्लिंगे  
भारतातील १२ जोतिर्लिंगांपैकी ५ महाराष्ट्रात आहे
त्र्यंबकेश्वर (नाशिक): गोदावरी नदीच्या उगमस्थानी वसलेले हे मंदिर पेशवेकालीन स्थापत्यशैलीचा नमुना आहे. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींचे प्रतीक असलेले लिंग आहे.
भीमाशंकर (पुणे): सह्याद्रीच्या दाट जंगलात वसलेले हे मंदिर भीमा नदीचे उगमस्थान आहे. हे मंदिर 'नागर' शैलीत बांधलेले आहे.
घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर): वेरूळ लेण्यांजवळ असलेले हे जोतिर्लिंग शेवटचे (१२ वे) मानले जाते. अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
परळी वैजनाथ (बीड): हे मंदिर डोंगररांगांमध्ये वसलेले असून ते वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते.
औंढा नागनाथ (हिंगोली): हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून याच्या भिंतींवरील कोरीव काम अत्यंत प्रेक्षणीय आहे.
 
२. साडेतीन शक्तिपीठे 
देवीची ही साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्राच्या अस्मितेचा भाग आहे.
महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर): याला 'करवीर निवासिनी अंबाबाई' असेही म्हणतात. हे मंदिर किरणोत्सवासाठी प्रसिद्ध आहे.
तुळजाभवानी मंदिर (तुळजापूर): छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता. हे मंदिर सोलापूरजवळ आहे.
रेणुका माता मंदिर (माहूर): नांदेड जिल्ह्यात असलेल्या या मंदिरात परशुरामाची माता रेणुका देवीचे वास्तव्य मानले जाते.
सप्तशृंगी माता (वणी, नाशिक): हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते. देवीची मूर्ती एका मोठ्या डोंगराच्या कड्यावर कोरलेली आहे.
 
३. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर 
हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे श्रध्दास्थान आहे. चंद्रभागा नदीच्या काठी वसलेल्या या मंदिरात 'विठ्ठल-रुक्मिणी' विराजमान आहेत. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी लाखो वारकरी येथे पायी चालत येतात.
 
४. अष्टविनायक
गणेशाची ही ८ स्वयंभू मंदिरे अत्यंत पवित्र मानली जातात
मयूरेश्वर (मोरगाव)
सिद्धिविनायक (सिद्धटेक)
बल्लाळेश्वर (पाली)
वरदविनायक (महड)
चिंतामणी (थेऊर)
गिरिजात्मज (लेण्याद्री)
विघ्नहर (ओझर)
महागणपती (रांजणगाव)
 
५. इतर महत्त्वाची धार्मिक स्थळे
साईबाबा मंदिर (शिर्डी): अहमदनगर जिल्ह्यातील हे स्थान जगभरातील भाविकांचे आकर्षण केंद्र आहे.
खंडोबा मंदिर (जेजुरी): पुण्याजवळील हे मंदिर 'भंडारा' (हळद) उधळण्यासाठी प्रसिद्ध आहे.
श्री गजानन महाराज मंदिर (शेगाव): बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये मध्ये असलेले हे मंदिर शिस्त आणि शांतात यासाठी आकर्षण केंद्र आहे. 
स्वामी समर्थ अक्कलकोट-  महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील थोर संत स्वामी समर्थ होऊन गेले. स्वामी समर्थ आंध्रप्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळी कर्दळीवनातून प्रकट झाले तेथून ते आसे तुहिमाचलास गेले.
शनि शिंगणापूर (अहमदनगर): येथील शनिदेवाची मूर्ती उघड्यावर असून या गावात घरांना दरवाजे नसतात, अशी लोकश्रद्धा आहे.
सिद्धिविनायक मंदिर (मुंबई): मुंबईतील प्रभादेवी येथे असलेले हे मंदिर गणपतीच्या सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.
 
महाराष्ट्रातील प्रमुख दत्त मंदिरे  
महाराष्ट्रामध्ये दत्त संप्रदायाला मोठी परंपरा असून राज्यात भगवान दत्तात्रेयांची अनेक जागृत आणि प्राचीन देवस्थाने आहेत. या ठिकाणांना 'दत्त क्षेत्र' म्हटले जाते.
श्री क्षेत्र औदुंबर (सांगली)
महत्त्व: श्री नृसिंह सरस्वती महाराज (दत्तात्रेयांचा दुसरा अवतार) यांनी येथे चातुर्मास निवास केला होता.
श्री क्षेत्र नरसोबाची वाडी (कोल्हापूर)
महत्त्व: याला 'दत्ताची राजधानी' मानले जाते. श्री नृसिंह सरस्वती येथे १२ वर्षे वास्तव्यास होते.
श्री क्षेत्र माहूर (नांदेड)
महत्त्व: हे भगवान दत्तात्रेयांचे जन्मस्थान मानले जाते. हे ठिकाण साडेतीन शक्तीपीठांपैकी एक (रेणुका माता) देखील आहे.
श्री क्षेत्र कारंजा (वाशिम)
महत्त्व: हे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे. याला 'लाड-कारंजे' असेही म्हणतात.
श्री क्षेत्र गाणगापूर (कर्नाटक - महाराष्ट्र सीमा)
टीप: हे जरी कर्नाटक राज्यात असले तरी महाराष्ट्रातील भाविकांचे हे मुख्य श्रद्धास्थान आहे.
दगडशेठ दत्त मंदिर (पुणे): पुणे शहरातील अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर.
एकमुखी दत्त मंदिर (कोल्हापूर/नारेश्वर): दत्तात्रेयांचे एक मुख असलेले रूप येथे पाहायला मिळते.
नारायणपूर (पुणे): सासवड जवळ असलेले हे मंदिर 'प्रति-गाणगापूर' म्हणून ओळखले जाते.
 
संत मंडळी समाधीस्थळे 
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. या संतांनी आपल्या विचारांनी आणि भक्तीने समाजाला दिशा दाखवली.  
प्रमुख संतांची समाधीस्थळे
संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी पुणे
संत तुकाराम महाराज देहू (वैकुंठगमन स्थान)पुणे
संत एकनाथ महाराज पैठण छत्रपती संभाजीनगर
संत नामदेव महाराज पंढरपूर (विठ्ठल मंदिर पायरी)सोलापूर
समर्थ रामदास स्वामी सज्जनगड सातारा
संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर नाशिक
संत सोपानदेव सासवड पुणे
संत मुक्ताबाई मुक्ताईनगर जळगाव
संत चोखामेळा पंढरपूर सोलापूर
संत गोरा कुंभार तेर धाराशिव 
संत गाडगे महाराज अमरावती
महाराष्ट्रातील मंदिरांची वैशिष्ट्ये
बहुतांश प्राचीन मंदिरे 'हेमाडपंती' शैलीत बांधलेली आहे, ज्यात दगडाला दगड जोडून (सिमेंटशिवाय) बांधकाम केले गेले आहे.
उत्सव: पालखी सोहळा आणि जत्रा हे या मंदिरांचे अविभाज्य भाग आहे.