बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शनिवार, 9 जानेवारी 2016 (16:17 IST)

एंजॉय युवर विकेंड

वीकेंडचं प्लानिंग करूनही ते जमलं नाही तर चिडचिड होते. त्यामुळे तुमची सुट्टी मस्त एंजॉय करण्यासाठीच्या या काही टिप्स.... 
दोन दिवसातल थोडासा वेळ छंदासाठक्ष जपून ठेवा. वाचन, नृत्य, गायन, वादन, लेखन असं तुमच्या आवडीचं काहीतरी करा. सुटीच्या दिवशीही तुमचे छंद जोपासायची संधी मिळाली नसेल तर आता या संधीचा पुरेपूर लाभ घ्या. सगळं बाजूला ठेवा आणि स्वत:साठी वेळ काढा. 
 
रोज व्यायामाला वेळ नसेल तर सुट्टीच्या दिवशी वॉकला जा. मोकळ्या हवेत फिरून आल्यावर तुम्हाला अगदी रिलॅक्स आणि हलकं वाटेल. 
 
थंडीत बाहेर फिरण्यापेक्षा मॉल, सिनेमा असं काहीतरी ठरवा. 
 
सुट्टीच्या दिवशी तुम्हाला कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा असतो. पण अशा वेळी कुणी पाहुणे आले की त्याच्या सरबराईतच सगळा वेळ जातो. त्यामुळे नको असलेल्या पाहुण्यांचे फोन, मेसेज टाळा. 
 
सुट्टीच्या दिवशी तुम्ही एखादं सामाजिक कार्यही करू शकता. एखाद्या अनाथाश्रमात जाऊन मुलांसोबत खेळा. वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठांसोबत गप्पा मारा. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आणि नव्या आठवड्याची सुरुवातही छान होईल. 
 
वीकेंड डिनर हा पण फार छान ऑप्शन आहे. कुटुंबासोबत छानशा हॉटेलात डिनरला जाऊ शकता.    
 
सुट्टीच्या दिवशी वादविवाद टाळा. उगाचच कोणाशी भांडू नका. जोडीदार किंवा कुटुंबियांशी वाद झाल्यावर तुमच्यासह सगळ्यांचा मूड खराब होईल. सुट्टीचे दोन दिवस मस्तपैकी आनंदात घालवा.