महाकालेश्वराच्या भात पूजनावर बंदी
|
तसेच श्री महाकालेश्वर मंदिर संस्थान समितीने शिवलिंगाच्या अभिषेकासाठी पाच वेगवेगळी द्रव्ये एकत्र करून एक तंत्र पंचामृत पूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वानुमते यंदा भात पूजनावर बंदी घालण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात पूजा करताना दूध, तूप, दही, मध, साखर मोठ्या प्रमाणात शिवलिंगावर अर्पण करून ते जोरात घासले जाते.
या पूजेने शिवलिंगाची झीज होण्याची शक्यता लक्षात घेता समिती एक तंत्र पंचामृत पूजन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शास्त्रोक्त व विद्वान परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
