देवाला साखळदंडाने बांधतात तेव्हा....
|
कालभैरव बाबा भक्तांना काठीने मार देतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. या मारापासून वाचण्यासाठी बाबांना लोखंडाच्या साखळदंडाने बांधण्यात आल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. बाबांना साखळदंडातून मुक्त केले तर काही खरे नाही, असे गावकरी म्हणतात.
हे मंदिर झाला राजपूत व गुजराती लोकांचे पूजनीय केवडास्वामी कालभैरव यांचे आहे. १४८१ मध्ये झाला राजपुतांच्या एका राजाला एक स्वप्न पडलं. त्यात आपले वाहून घेऊन चला असा आदेश होता. रस्त्यात गाडीचे चाक जिथे तुटून पजेल तिथे राज्य स्थापन कर असे सांगण्यात आले होते. राजाने त्या प्रमाणे केले. जिथे चाक तुटले तिथेच केवडास्वामी भैरवबाबाचे मंदिर बांधले. येथून काही राजपूत राजस्थानात निघून गेले. काही जण इथेच थांबले.
|
भैरवबाबांचा महिमा एवढाच नाही. भैरवबाबा सिगरेट आणि दारूचे शौकीन आहेत. बाबांना मुक्त केले तर ते खूप त्रास देतील, असे गावकर्यांचे म्हणणे आहे. बाबा काठ्या, मिठाई आणि दारू चोरतात, असे एका ज्येष्ठाने सांगितले. या नादापोटी बाबांनी गाव सोडून जाऊ नये म्हणून त्यांना साखळदंडाने बांधले आहे.
|
|
|
या चमत्कारिक देवाविषयी आपल्याला काय वाटते? आम्हाला जरूर कळवा.
