1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|

BRL सेलमध्ये विलीन

BRL सेलमध्ये विलीन
भारत रिफॅक्ट्रीज लिमिटेड (बीआरएल) चे भारतीय पोलाद प्राधिकरण लिमिटेड अर्थात सेलमध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे.

एक एप्रिल 2007 पासून हे विलिनीकरण ग्राह्य मानले जाणार आहे. सेलने दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी 2006मध्ये इंडियन आयर्न एंण्ड स्टील कंपनी लिमिटेड इस्कोचे विलिनीकरण करण्यात आले आहे.

मागील काही वर्षांपासून बीआरएल आर्थिक संकटात सापडली असून, 1992 मध्ये कंपनीला बीआयएफआरमध्ये स्थानांतरीत करण्यात आले होते.