1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Pappu Yadav attacked with a knife

पत्रकार परिषदेदरम्यान खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला

बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत असताना यादव यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. मात्र, सुरक्षा कर्मचारी आणि समर्थकांनी हल्लेखोराला वेळीच पकडले आणि त्याला जागीच मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. यादव म्हणाले, "हा हल्ला माझ्या हत्येचा कट होता. जर जनता नसती, तर आज माझा मृत्यू झाला असता. पोलिसांनी चाकू जप्त केला आहे."
माहितीनुसार आरोपी बुलंदशहरचा असल्याचे सांगितले जात आहे. संशयिताकडून जप्त केलेल्या चाकूचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहे. पोलीस हल्लेखोराची ओळख आणि त्याच्या हेतूचा तपास करत आहे.

Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता! या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा जारी