1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. accident on railway line

रेल्वे रुळांवर घातपात होण्याची शक्यता

महाराष्ट्र रेल्वे रुळ घातपात
महाराष्ट्रातल्या रेल्वे रुळांवर देखील घातपात होण्याची शक्यता महाराष्ट्र पोलिसांनी वर्तवली आहे. महाराष्ट्र पोलीसांनी रेल्वेला पत्र लिहून सुरक्षा वाढविण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या मते दहशतवतवादी संघटना एक मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत आहेत. भिकारी किंवा विक्रेत्यांच्या वेशात दहशतवादी घातपात घडवू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे विभागाने यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. यात रेल्वे स्टेशन आणि ट्रकवर पेट्रोलिंग वाढवण्याच्या तसंच भिकारी, विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील लेख
वैयक्तिक कारणांमुळे राज परदेशात जाणार, गुढीपाडवा मेळावा रद्द