अनिल अंबानी सरकारवर खूश
अंबानी भावांच्या वादाशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचे सरकारने उच्च न्यायालयात स्पष्ट केल्याने सरकारच्या या भूमिकेचे रिलायन्स रिर्सोसेज लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी स्वागत केले आहे.
मुकेश आणि अनिल या अंबानी भावांमध्ये कृष्णा गोदावरी खोऱ्यातील गॅस प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. सरकार या प्रकरणात मुकेश यांची बाजू घेत असल्याचा आरोप अनिल यांनी केला आहे.
यासाठी त्यांनी वर्तमानपत्रांचा वापर करत सरकार आणि मुकेश यांच्या विरोधात जोरदार प्रचार अभियानही राबवले. यानंतर उच्च न्यायालयात सरकारने या प्रकरणी आपली भूमिका बदलत या भांडणात सरकारचा कोणताही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग नसल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी न्यायालयाने 2005मध्ये अंबानी भावात झालेल्या वाटण्या प्रकरणी अनिल यांची मागणी करणारी एक याचिका मान्य केली आहे.