आजच लागणार जेटचा ''निकाल''
जेट व्यवस्थापन आणि पायलटांच्या वादावर आजच 'निकाल' लागणार आहे. जेट व्यवस्थापनाने निलंबित केलेल्या पायलटांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्यास नकार दिल्यानंतर नॅशनल एव्हिएशन गिल्ड (नॅग) ने बैठक बोलावली असून, यानंतर महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
आपल्या दोन सहकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर जेटचे 432 पायलट सामूहिक रजेवर गेले आहेत. मागील तीन दिवसांपासून त्यांचे हे आंदोलन सुरू असल्याने जेटला कोट्यवधीचा फटका तर बसला आहेच, शिवाय प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.
या प्रकरणी प्रशासनाने झुकण्यास नकार देत कामावर परतण्याचा इशारा पायलटांना दिला आहे. आज होणाऱ्या बैठकीनंतरच या बाबतची पायलटांची भूमिका स्पष्ट होणार असल्याचे नॅगच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.