1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

एक रुपयात बोला अनलिमिटेड

टाटा टेलीसर्विसेजने आपल्या सीडीएमए ग्राहकांसाठी खास योजना सुरू केली आहे. आता कंपनीचे ग्राहक एक रुपयांमध्ये स्थानिक स्तरावर तर तीन रुपयांमध्ये एसटीडीचा अनलिमिटेड वापर करू शकणार आहेत.

कंपनीने या खास योजनेची मंगळवारी घोषणा केली. ग्राहक आता कोणत्याही मोबाईलवर किंवा लँडलाइनवर अनलिमिटेड बोलू शकणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून कंपनीने पल्स रेटच संपवल्याचे बोलले जात आहे.

ही सेवा तूर्तास सध्या प्री प्रेड ग्राहकांना पुरवण्यात आली असून, यासाठी ग्राहकांना दररोज एक रुपया कंपनीला द्यावा लागणार आहे.